मधुमेह (डायबिटीस)

     आज आपण या ब्लॉक मध्ये मधुमेह लक्षणे कारणे उपचार प्रतिबंध आणि बरेच काही या विषयी माहिती अधिक पेक्षा अधिक जाणून घेणार आहे

       मधुमेह हा एक आजार आहे जो तुमच्या रक्तातील ग्लुकोज ज्याला रक्तातील साखर देखील म्हटले जाते खूप जास्त असते तेव्हा होतो रक्तातील ग्लुकोज हा तुमच्या ऊर्जेचा मुख्य स्तोत्र आहे आणि त्यातून येतो मधुमेह होऊन जाते. ग्ल्यूकोज हे साखरेचेच एक रूप आहे.

What is Diabetes: Symptoms, Causes, Treatment, Prevention and more मधुमेह: लक्षणे, कारणे, उपचार, प्रतिबंध आणि बरेच काही

     सामान्यतः आपण जे भोजन करतो ते पोटात गेल्यानंतर वेगवेगळ्या पदार्थामध्ये बदलले जाते. त्यांतच ग्ल्यूकोजही आहे. ग्ल्यूकोज रक्तप्रवाहात मिसळले जाते आणि 'इन्स्यूलिन'च्या मदतीने शरीरातील लाखो पेशींपर्यंत पोचवले जाते. इन्स्यूलिन हे रसायन (हार्मोन) अग्न्याशयात ('पॅनक्रिज'मध्ये) बनते आणि ते रक्तप्रवाहात मिसळून पेशींपर्यंत जाते आणि तिथे ग्ल्यूकोजला पेशींच्या आतपर्यंत पोचवण्यात मदत करते. पेशी ग्ल्यूकोजला उपापचित (ऊष्ण) करतात त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. उर्जेमुळे शरीर हालचाल करते.

         आपल्या भोजनात कार्बोहायड्रेट्स (पिष्टमय पदार्थ) मध्ये सामान्य शर्करा असते. ग्ल्यूकोज जे शरीराला उर्जा प्रदान करते तेही पिष्टमय पदार्थापासून मिळते. भोजन झाल्यावर काही वेळाने आतड्यात पिष्टमय पदार्थाचे लहान लहान तुकडे केले जातात आणि त्यातील ग्लूकोज शोषून घेतले जाते. हे ग्ल्यूकोज रक्तनलिकांमधून संपूर्ण शरीरात पोचवले जाते परंतु इन्स्यूलिनशिवाय ते पेशींमध्ये पोचू शकत नाही. दोन्ही एकत्रच पेशींमध्ये जातात. इन्स्यूलिनची कमतरता झाल्यास रक्तात ग्ल्यूकोज भरपूर असूनही पेशींमध्ये न पोहोचल्याने उर्जेचा अभाव होऊन त्या उपाशी ह्याच स्थितीला मधुमेह म्हणतात. राहतात.

नुम मधुमेहात शरीर पुरेसे इन्स्यूलिन निर्माण करू शकत नाही अथवा त्याचा ठीकपणे उपयोग करू शकत नाही. त्यामुळे पेशींमधील रिसेप्टर्स उघडले जात नाहीत आणि

ग्ल्यूकोजचा पुरेसा उपयोग होऊ शकत नाही. या स्थितीला इंग्रजीत 'इन्स्यूलिन रेझिस्टन्स' म्हणतात. शरीराला भोजनापासून उर्जा प्राप्त करण्यात अडचणी येतात.

मधुमेहाची लक्षणे.

'टाइप - २' च्या मधुमेहाच्या रुग्णांमध्ये पुष्कळदा कोणतेही लक्षण आढळत

नाही. त्यांना रक्ताच्या परीक्षणातून अथवा दुसरा कुठला रोग झालेला असताना केलेल्या चाचणीतून मधुमेह असल्याचे समजते. ज्या रोग्यांमध्ये रक्तशर्करा फार जास्त असते अशा 'टाईप- १' च्या रुग्णांमध्ये निम्नांकित लक्षणे दिसू शकतात.

  1. वारंवार लघवीला जाणे.
  2. तहान जास्त लागणे
  3. अकारण वजन कमी होणे
  4. सतत भूक लागणे
  5. लवकर थकणे आणि अशक्तपणा जाणवणे
  6. डोळ्यांनी अंधूक दिसणे
  7. त्वचा आणि जननांगात खाज सुटणे 
  8. जखम भरून येण्यास अधिक काळ लागणे
  9. त्वचेत अथवा शरीरात संक्रमण होणे 
  10. हातापायात मुंग्या येणे, सुन्न होणे, आणि
  11. संभोग करता न येणे (नपुसकता)

     उपरोक्त लक्षणांबरोबर जर त्वचेचा रंग, कांती अथवा जाडीत फरक आढळला. कीटाणू संक्रमणाचे प्रारंभिक लक्षण जसे की लालसरपणा, सूज, गरम त्वचा, स्त्रियांना योनिमार्गात वा गुदमार्गात, बगला वा स्तनाच्या खालती, दोन बोटांच्या मध्यभागी खाज सुटत असेल किंवा शेवाळ्याप्रमाणे काही संकेत मिळाले तर रुग्णाने लगेचच चिकित्सकाची भेट घ्यायला हवी.

     सामान्यतः मधुमेहाचा संबंध रक्तशर्करेच्या प्रमाणाशी असतो. यात ग्ल्यूकोज लघवीवाटे बाहेर येऊ लागते. त्यामुळे लघवीला वारंवार लागू लागते. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने डी-हायड्रेशन होण्याची पाळी येते. तहान अधिक प्रमाणात लागून मनुष्य खूप पाणी पिऊ लागतो. इन्स्यूलिनची कमतरता प्रोटीन, चरबी आणि पिष्टमय

     पदार्थ यांचे चयापचय (मेटॅबोलिझम) प्रभावित करते. मधुमेहाच्या रोग्यांना मूत्रस्थानी व स्त्रियांना योनीच्या भागात संक्रमण (इन्फेक्शन) अधिक होण्याची संभावना असते. रक्तशर्करेच्या प्रमाणात वाढ-घट होत राहिल्याने डोळ्यांनी धूसर दिसू लागते.

मधुमेहाचे प्रकार

मधुमेह मुख्यत: तीन प्रकारचा असतो - टाईप - १ - टाईप २ आणि स्त्रियांना गर्भावस्थेच्या वेळी होणारा सगर्भतेचा (गेस्टॅशनल) मधुमेह. याखेरीज कधी औषधांमुळे अथवा अन्य काही आजारपणांमुळेही मधुमेह होऊ शकतो.

टाईप १ डी. एम. (डायाबिटीस) - यात मानव शरीर कोणत्याही प्रकारचे इन्स्यूलिन तयार करीत नाही. म्हणजेच शरीरात इंन्स्यूलिन बनणे बंद होते. इन्सूलिन एक महत्त्वाचे हार्मोन आहे. ज्याच्यामुळे शरीर ग्ल्यूकोजचा उपयोग करण्यात सक्षम होते. इन्स्यूलिन शरीराला बनवणारे आणि ठीक करणारे (अॅनॅबोलिक) हार्मोन आहे. हे भोजनापासून चरबी वाढविण्यास प्रोत्साहन देते आणि शरीरात प्रोटीनचे प्रमाण वाढवते. 

      टाईप १ डी. एम. हा प्रकार बहुतेक करून मुलांमध्ये आणि तरुणांमध्येच आढळतो. परंतु क्वचित् वृद्धजनांमधेही पाहायला मिळतो. या रुग्णांसाठी इन्स्यूलिन जीवनदायक अमृततुल्य आहे. कारण त्याशिवाय ते अधिक काळ जगू शकणार नाहीत. ग्ल्यूकोज आणि किटोन्सचा वाढता स्तर टाईप १ च्या - रुग्णांमध्ये सुस्ती किंवा 'कोमा'ची स्थिती निर्माण करू शकतो.

२) डायाबिटिस मेलीटस टाईप - २ डी. एम. टाईप - २ - मधुमेह एक 'क्रॉनिक' म्हणजे चिरकाल टिकणारा रोग आहे. यात शरीर पुरेसे इन्स्यूलिन निर्माण करीत नाही आणि त्याचा उचित उपयोगही करू शकत नाही. त्यामुळे शरीर ग्ल्यूकोजचा संग्रह आणि पूर्ण उपयोग करण्यात सक्षम राहात नाही आणि साखरेला ऊर्जेत बदलू शकत नाही. परिणामतः रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. आणि तेच मधुमेहाचे लक्षण आहे. या प्रकारच्या मधुमेहाला प्रौढांचा मधुमेह किंवा बिना इन्स्यूलिन आधारीत मधुमेह म्हटले जाते. टाईप - २ च्या मधुमेहात कधी कधी या आजाराचे कोणतेच लक्षण दिसत नाही. लोक सामान्य जीवन जगत राहतात आणि वर्षानुवर्षे पत्ता लागत नाही की त्यांना मधुमेह आहे. त्यांच्यात मधुमेहांचे पदार्पण इतके हळूहळू होते की लक्षणे ओळखता येत नाहीत आणि दुष्परिणाम दिसल्यावरच ते चिकित्सकांकडे जातात.

३) जेस्टेशनल (सगर्भतेचा) मधुमेह - स्त्रियांना गर्भावस्थेत रक्तशर्करेचा स्तर असामान्यपणे वाढल्यास त्याला जेस्टेशनल मधुमेह म्हणतात. गर्भावस्थेत हार्मोन्समध्ये जे परिवर्तन होते त्यामुळे इन्स्यूलिनचे कार्य प्रभावित होते आणि रक्तशर्करेत वाढ होते. म्हणून स्त्रियांनी त्यांच्या चिकित्सकांकडून तपासण्या करून घ्याव्यात की साखरेचा स्तर वाढला आहे काय आणि वाढला असेल तर 'ग्ल्यूकोज टॉलरन्स टेस्ट' ही करावी. यामुळे आपणास कळून येईल की जेस्टेशनल मधुमेह आहे अथवा नाही. सर्व गर्भवती महिलांनी गर्भधारणेनंतर १२व्या, २४ व्या आणि २८ व्या सप्ताहात 'ग्ल्यूकोज टॉलरन्स टेस्ट' करायला हवी.

जेव्हा गर्भवतीचा शर्करेचा स्तर वाढतो तेव्हा तो 'प्लेसेन्टा'ला ओलांडून गर्भापर्यंत पोहोचतो. बाळाला अधिक प्रमाणात ग्ल्यूकोज मिळाल्याने ते लवकर मोठे आणि वजनदार होत जाते. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी मातेला त्रास होऊ शकतो. शस्त्रक्रियेची वेळ येते. पण प्रसूतिनंतर बाळाची शर्करा कमी होऊ शकते. त्याला काविळ, श्वासासंबंधित तक्रारी होऊ शकतात आणि पुढे या बालकास लठ्ठपणा आणि शर्करावृद्धी असा दोन्ही त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

मधुमेहाचे दूरगामी दुष्परिणाम

रक्तात निरंतर शर्करेचे प्रमाण वाढल्यामुळे आणि कोलेस्टेरॉलमुळे धमन्या दुर्बळ व अवरुद्ध होऊ शकतात आणि त्यामुळे निम्नलिखित समस्या वा रोग निर्माण होऊ शकतात.

१) डोळ्यांचे आजार (रेटिनोपॅथी)

२) किडनीरोग (नेफरोपॅथी)

३) नसा क्षतिग्रस्त होणे (न्यूरोपॅथी )

४) हृदयविकार होऊ शकतो (कोरोनरी आर्टरी डिसीज)

५) मेंदूचा विकार (स्ट्रोक)

६) पाय कापावा लागू शकतो (अॅम्प्यूटेशन)

७) लैंगिक समस्या होऊ शकतात (इरेक्टाईल डिसफंक्शन) ८) टी.बी. रोगाप्रमाणे कोणतेही संक्रमण (इन्फेक्शन) होणे, इत्यादि,

मधुमेह आणि हृदय - धमनी रोग मधुमेहाच्या रोग्यांचा जास्त करून हृदयाघाताने मृत्यू होतो, त्याचे मुख्य कारण हृदय धमनी रोग हे आहे. ह्या रोगांना अल्पवयातच हृदयरोग होऊ शकतो. द्वितीय हृदयघाताचीही संभावना असते. मधुमेह जितका दीर्घकाळ राहील, हृदयाघात अधिक गंभीर आणि घातक होऊ शकतो. ह्या रुग्णांना अधिकतर आघाताच्या वेळी छातीत कळ येत नाही कारण वेदनेची जाणीव देणारे स्नायू क्षतिग्रस्त झालेले असतात. म्हणून त्याला शांत किंवा मूक हृदयाघात म्हटले जाते.

साधारणपणे पुरुषांपेक्षा स्त्रियांना हृदयाघात होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु मधुमेहग्रसित रजोनिवृत्त (मीनोपॉज) महिलांमध्ये जेव्हा इस्ट्रोजन हार्मोनचे सुरक्षा कवच निष्प्रभावी होते तेव्हा त्यांना हृदयरोग होण्याचा धोका असतो आणि पुरुष आणि स्त्रिया दोघे समान रूपे प्रभावित होऊ शकतात. मधुमेहाच्या रोग्यांना एन्झाइना झाल्यास छातीत कळ न येता श्वास फुलणे, चक्कर येणे, हृदयगती अनियमित झाल्याने घडघडणे अशी लक्षणे दिसतात. मधुमेहींना रक्तवाहिन्यांमध्ये एधिरो स्क्लेरॉसिसमधील बदल कमी वयातच सुरू होऊन द्रुत गतीने वाढू लागतात.

मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब हे तीनही रोग घातक व गंभीर आहेत. या तिघांचा आपापसांत घनिष्ट संबंध असतो. मधुमेहामुळे निर्माण होणारी जटिलता कमी करण्यासाठी नियमित आहार, व्यायाम, इन्स्युलिन इन्जेक्शन (अथवा आय.एम.ई. - ९ या गोळ्या) डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्याव्यात. जेणेकरून रक्तशर्करा सामान्य व्हावी आणि रक्तदाब व कोलेस्टेरॉल नियंत्रित राहावे.

मधुमेहाचे निदान

निदानासाठी परीक्षणे

१) फास्टिंग ब्लड ग्ल्यूकोज टेस्ट - मधुमेह आहे अथवा नाही हे ओळखण्याची 'फास्टिंग ब्लड ग्ल्यूकोज टेस्ट' ही एक सगळ्यात चांगली पद्धत आहे. साशंकित व्यक्तीने परीक्षणाच्या आदल्या रात्री उपवास करायचा असतो. कमीत कमी ८ तासांनंतर सकाळी रक्ताचा नमूना घेऊन प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवला जातो. हे परीक्षण ग्ल्यूकोज मीटर द्वाराही करता येते. (अ) सामान्यतः फास्टिंग प्लाज्मा ग्ल्यूकोज (एफ. पी. जी.) १०० मिलीग्राम प्रतिडेसी लिटर (एम. जी. / डी. एल.) इतके किंवा त्यापेक्षा कमी असावे लागते. ब) एफ्. पी. जी. जर १२६ एम.जी./ डी.एल. पेक्षा अधिक असेल तर हे परीक्षण पुनः एकदा एखाद्या अन्य दिनी केले जाते आणि जर तेव्हाचे प्रमाण १२६ पेक्षा अधिक असेल तर त्याचा अर्थ मधुमेह आहे.

क) अचानक ग्ल्यूकोज टेस्टही करता येते. आर. बी. एस्. २०० एम. जी. / डी. एल. इतके किंवा अधिक असेल आणि व्यक्तीला मधुमेहाची लक्षणे, जसे की अधिक तहान लागणे, वारंवार लघवीला जाणे इ. असेल तर ते मधुमेह असण्याचे द्योतक आहे.

२) ओरल ग्ल्यूको टॉलरन्स टेस्ट (ओ. जी. टी. टी.) हे परीक्षण मधुमेहाचे निदान करण्यासाठी 'गोल्ड स्टॅन्डर्ड टेस्ट' (सोन्याप्रमाणे) बहुमूल्य मानले जाते. ह्याचा उपयोग सामान्यतः 'जेस्टेनेशनल डायाबिटिस' ओळखण्यासाठी केला जातो. मधुमेह होण्यापूर्वीची स्थिती (प्री-डायाबिटिस) पण

जाणता येते. प्रथम 'फास्टिंग प्लाज्मा टेस्ट' केली जाते. नंतर व्यक्तीला ७५ ग्राम ग्लूकोज ३०० एम. एल. पाण्यातून दिले जाते. जर एखादी स्त्री गरोदर असेल तर तिला १०० ग्राम ग्ल्यूकोज दिले जाते. ग्ल्यूकोजचे प्रमाण जाणण्यासाठी रक्ताचे नमुने एका निश्चित कालावधीनंतर परीक्षणासाठी घेतले जातात. ओ. जी. टी. टी. साठी निम्नाकिंत बाबी गरजेच्या असतात.

अ) व्यक्तीचे आरोग्य चांगले असायला हवे, त्याला कोणताही रोग, अर्थात सर्दी -- खोकला सुद्धा असता कामा नये.

ब) व्यक्ती सामान्यतः क्रियाशील असायला हवी (म्हणजेच त्याने अंथरूण पकडलेले नसले पाहिजे)

क) परीक्षणाच्या तीन दिवस आधीपासून त्या व्यक्तीने पिष्टमयपदार्थयुक्त (कार्बोहायड्रेट्सचे) भोजन (२०० ग्रॅम प्रतिदिन) करावे. ड) परीक्षणाच्या दिवशी सकाळी त्याने धुम्रपान, चहा-कॉफी असे काही घेता कामा नये. या ओ.जी. टी. टीमध्ये दोन तासाच्या अवधीत दर ३० मिनिटांनी ४-५ वेळाग्ल्यूकोजचा स्तर मापला जातो. साधारणतः रक्ताचा बेसलाईन नमूना (फास्टींग ब्लड शुगर) आणि ग्ल्यूकोजचे मिश्रण पाजल्यानंतर दोन तासांनी प्लाज्मा शुगर मापली जाते. सामान्य माणसांत ग्ल्यूकोजचा स्तर दोन तासांत सामान्य होऊन जातो परंतु ज्यांना मधुमेह असतो त्यांचा स्तर उच्च राहतो. अध्ययन सांगते की इम्पेयर्ड ग्ल्यूकोज टॉलरन्स स्वतःच एक चेतावणी (रिस्क फॅक्टर) आहे कारण अशा लोकांना हृदयरोग आणि मधुमेह भविष्यात होण्याची संभावना अधिक असते.

परिणाम

अ) सामान्य - जर २ तासात रक्त शर्करेचा स्तर १४० एम जी / डी. एल पेक्ष झालेली आढळते तर स्तर सामान्य समजला जातो.

ब) इम्पेयर्ड ग्ल्यूकोज टॉलरन्स (आय. जी.टी.) - जेव्हा फास्टिंग प्लाज्मा ग्ल्यूकोज स्तर १२६ एम. जी / डी.एल पेक्षा कमी असतो आणि २ तासांचा ग्ल्यूकोज स्तर १४० ते १९९ च्या मध्य असतो तेव्हा व्यक्तीला ह्या श्रेणीचा मानले जाते.

क) इम्पेयर्ड फास्टिंग ग्ल्यूकोज (आय. एफ. जी) - यात फास्टींग शुगर १२६ एम.जी. / डि.एल. पेक्षा कमी किन्तु ११० एम. जी. / डी. एल. पेक्षा अधिक आणि २ तासानंतरची १४० पेक्षा कमी असते.

ड) मधुमेह - जेव्हा फास्टिंग प्लाज्मा ग्ल्यूकोजचा स्तर ग्ल्यूकोज घेतल्यानंतर दोन तासांनी २०० एम. जी / डी. एल. असतो तेव्हा त्याला मधुमेह समजले जाते.

मधुमेह आणि व्यायाम

मधुमेही रुग्णांना एक चिंता अशी वाटते की हा रोग आपल्याला व्यायाम करू शकण्याच्या स्थितीत तरी ठेवेल की नाही! पण त्यांची ही चिंता सोडून द्यावी. मधुमेह आपणास व्यायाम करण्यात बाधक राहात नाही. एवढेच की आपण योग्य तो व्यायामाचा प्रकार निवडावा लागतो. व्यायामामुळे रक्तशर्करेची पातळी कमी होते. त्यामुळे ग्ल्यूकोजचा उपयोग करण्याची शारीरिक क्षमता वाढते. ताशी ६ किलोमीटर गतीने चालल्यास ३० मिनिटांत १३५ कॅलरी आणि सायकल चालविण्याने २०० कॅलरी उर्जा खर्च होते. व्यायामाने शरीरात स्फुर्ती येते आणि इन्स्यूलिनची कार्यक्षमता वाढते. प्रत्येकाने दररोज कमीतकमी २० ते ३० मिनिटे व्यायाम करायला हवा. व्यायामापासून जे लाभ होतात ते लक्षात घेता निरंतर व्यायाम करीत राहणे गरजेचे असते. मधुमेहपीडितांसाठी व्यायाम मधुमेहींसाठी व्यायाम दोन तऱ्हेने उपयुक्त आहे. एक, व्यायाम करतेवेळी आणि नंतरही उर्जा मिळावी म्हणून रक्तातून काही ग्ल्यूकोज बाहेर पडते आणि अशा तन्हेने व्यायामामुळे रक्तातील ग्ल्यूकोजचा स्तर कमी होतो. दुसरा लाभ असा आहे की मोठ्या रक्तवाहिन्यांचे विकार आणि हृदयविकार प्रलंबित होतो.            हृदयरोगामुळे मृत्युमुखी पडण्याचे मधुमेह हे एक कारण होत असते. हृदयविकाराची जोखीम कमी करण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि आनंदात राहण्यासाठी मधुमेहाच्या रुग्णांनी नित्य व्यायाम करणे आवश्यक असते. व्यायामामुळे जीवनशैलीत जी सुधारणा होते त्याचा परिणाम असा होतो की रक्तातील ग्ल्यूकोज नियंत्रित ठेवता येते. व्यायामाची सुरुवात कोणता व्यायाम करावा ते आपल्या मनानेच ठरवू नाही, तर (फिजिओथेरपिस्ट) भौतिकी चिकित्सकांच्या सल्ल्याने करावा. आपल्या सक्रिय जीवनशैलीसाठी ते आवश्यक आहे. थेरपिस्ट तुमची परीक्षा करून व्यक्तिगतरित्या तुमच्या क्षमतेनुसार योग्य तेच व्यायामाचे प्रकार तुमच्यासाठी निवडतो. 

     तुमच्या गरजेनुसार व्यायामयोजना सुनिश्चित करणे हा एकमात्र उपाय आहे. कारण एकच एक व्यायाम सर्वांसाठी उपयुक्त नसतो. प्रत्येक व्यक्तीचे शारीरिक स्वास्थ्य वेगळे असते. आधुनिक इस्पितळांमध्ये फिजिओथेरपिस्टच्या कक्षात रुग्णांना उपयुक्त अशी विविध साधने ठेवलेली असतात. (उदाहरणार्थ, पायाने चालवत राहण्याचे सायकलप्रमाणे एक यंत्र. त्याने पाय मजबूत होतात.) त्यांतील तुम्हाला योग्य तेच साधन थेरपिस्ट निवडतो आणि तुमच्याकडून ठराविक वेळी व्यायाम करवूनही घेतो. तिथे जे स्वास्थ्य दल (टीम) असते ते कोणतीही चूक होऊ नये याची काळजी घेते. त्यामुळे आपल्याला व्यायामाचा केवळ लाभच मिळतो.

      व्यायामाचे वेळी एखादे पेय पिणे योग्य आहे काय ? होय. केवळ व्यायामाचे वेळीच नव्हे तर अगोदर आणि नंतरही एखादे पेय पिण्याचा सल्ला दिला जातो कारण त्यामुळे डिहायड्रेशन (जलविहिनता) होत नाही. तेथील आहारतज्ञ कुठले पेय (उदाहरणार्थ, कोणत्याही फळाचा रस किंवा ताक वगैरे) तुमच्यासाठी पोषक ठरेल ते सांगतात, ते एकदा ठरवून घ्यावे. आणि त्याप्रमाणे वागावे. त्यामुळे ज्या जीवनसत्त्वांची आपल्यात कमतरता असेल त्यांची • पूर्ती होते. खास करून मधुमेह पिडितांसाठी हे गरजेचे आहे.

वयोवृद्धांनी व्यायाम करणे उचित आहे काय ?

अनेक वयोवृद्ध जनांना चालता-फिरता येत नाही. ते एका जागी बसून असतात. त्यांच्यासाठी काय सल्ला आहे? या प्रश्नाचे उत्तर असे की या रुग्णांनी देखील व्यायाम करणे अत्यावश्यक आहे. घरात बसल्या बसल्याही ते 'स्ट्रेचिंग'चा व्यायाम, म्हणजे शारीरिक अंगांना ताणण्याचा व्यायाम अथवा काही सोपी योगासने करू शकतात. 'स्ट्रेचिंग'च्या व्यायामाने शरीरात स्फूर्ती येते. या व्यायामानंतर तुम्ही अधिक काम करू शकाल.

      मधुमेह आणि गाठींचा रोग, दोन्ही असेल तरी व्यायाम करावा काय ? होय. तुमच्यासाठी निवडून दिलेला व्यायाम करण्यापूर्वी 'स्ट्रेचिंग'चा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे स्नायूंना शक्ती मिळते व बरे वाटते.

मधुमेहाच्या रोग्यांनी काही मर्यादेपर्यंतच व्यायाम करावा काय ? "नाही. मधुमेहींसाठी अशी कोणतीही सीमा नाही. जर त्यांना अन्य कोणताही रोग नसेल तर ते सामान्यांप्रमाणे सर्व काही करू शकतात. फिरायला जाणे, सायकल चालवणे, पोहणे असा कोणताही व्यायाम ते करू शकतात. परंतु प्रत्येकाच्या आजाराचे प्रमाण व प्रकृती कमीजास्त असू शकते. त्यामुळे थेरपिस्टकडून कोणता व किती व्यायाम ते ठरवून घ्यावे.

(जिम) व्यायामशाळेत कोणत्या यंत्रांवर किती व्यायाम करावा ? 'स्टेअरक्लाईंबर्स' किंवा 'ट्रेडमिल' या व्यायामासाठी उत्कृष्ट यंत्रे आहेत, त्यांवर चालणे, पळणे, चढणे असे व्यायाम करता येतात. त्याने लठ्ठपणा कमी होतो. सहनशक्ती वाढते. कार्डियो-व्हॅस्क्यूलरप्रणाली उत्कृष्ट होते. वजन उचलणे हाही एक चांगला व्यायाम आहे. जो व्यायाम तुम्ही आनंदाने करू शकाल, तो करावा.

रक्तशर्करेचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी चांगला व्यायाम कोणता? त्यासाठी फिरायला जाणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. त्याखेरीज अन्य कोणता व्यायाम करायची इच्छा असल्यास तो फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने निवडावा.

मधुमेहात व्यायामाचा कशा प्रकारे उपयोग होतो ?

एक तर, व्यायामाने वजन नियंत्रित राहते, आणि त्याच वेळी आपल्या रक्तशर्करेचा स्तरही कमी होतो. उचित व्यायामाने हृदयविकाराची संभावनाही राहात नाही. मधुमेहाच्या रोग्यांमध्ये हृदयरोगाची लक्षणे नेहमीच आढळतात. व्यायामाने स्वास्थ्यलाभ होतो.

व्यायामाचे प्रकार व पद्धत एअरोबिक्स - याच्या अंतर्गत द्रुतगतीने चालणे, जॉगिंग (हिंडणे-फिरणे),

नृत्य, सायकल चालवणे हे प्रकार येतात. या व्यायामामुळे श्वसनतंत्र सक्रिय राहते. हृदयाचा व्यायाम होतो.

योगा - मधुमेहाच्या रोग्यांनी योगा शिक्षकांकडून त्यांच्या प्रकृतीस साजेशी योगासने शिकून घ्यावीत व योगा क्लासेसमध्ये मार्गदर्शनाखाली करणे अधिक चांगले राहील. ही आसने घरी देखील करता येतात. 

अन्य व्यायाम जर आपल्या पायांमध्ये त्रास असेल तर डॉक्टर आपणांस पायांसाठी योग्य व्यायाम सुचवतात, जसे की पोहणे, सायकल चालवणे इ.

व्यायामाची पद्धत कोणताही व्यायाम करण्यापूर्वी ५-१० मिनिटे हळूहळू हलक्या व्यायामाने सुरुवात करावी, स्वतःला गरम करावे आणि सर्व व्यायाम झाल्यानंतर पुन्हा हलक्या व्यायामांनी स्वतःला थंड करावे. कोणत्याही व्यायाम हळूहळू क्रमाक्रमाने करावा. या बाबतीत आपल्या डॉक्टरांशी चर्चा करावी.

मधुमेहाच्या रोग्यांनी कोणता व्यायाम करण्यात धोका आहे ? या रुग्णांसाठी व्यायामात धोका असू शकते. परंतु, तसे पाहिले तर धोक्यापेक्षा लाभच अधिक असतात. नियमित व्यायामामुळे आपले शरीर इन्स्यूलिनच्या बाबतीत अधिक संवेदनशील बनते आणि रक्तशर्करेची पातळी खालती येते. त्यासाठी व्यायामाच्या पूर्वी आणि नंतर रक्तशर्करेचा स्तर तपासून घ्यावा. जर स्तर अत्याधिक कमी किंवा उच्च असेल तर थोडे थांबावे व व्यायामासाठी योग्य स्तर झाल्यावर व्यायाम करावा. जर व्यायामाच्या स्थळाचे तापमान शीत किंवा उष्ण असेल तर आपल्या रक्तशर्करेवर लक्ष ठेवावे कारण तापमानाच्या प्रमाणात आपले शरीर इन्स्यूलिनचे अवशोषण करते.

व्यायाम करतेवेळी रक्त-शर्करा कमी असल्यास कसे ओळखावे ?

हायपोग्लेसिमियाचा प्रभाव हळूहळू कमी होतो. म्हणून सतर्क राहावे लागते. व्यायामाचे वेळी आपणास काय वाटत असते? जर हृदयाच्या थडकण्यात फरक वाटला, नर्व्हस आणि थकलेपणा वाटत असेल, सामान्यांपेक्षा अधिक घाम आल्यास समजावे की रक्तशर्करेचे प्रमाण अत्यधिक कमी आहे आणि लगेच व्यायाम करणे थांबवावे. डॉक्टरांच्या सल्ल्याने हायपोग्लेसिमियाचा उपचार करावा. ग्ल्यूकोमीटरद्वारा रक्तातील साखरेचे प्रमाण तपासावे. ज्यांना हायपोग्लेसिमिया असेल त्यांनी तत्काल १५ ग्रॅम द्रुत क्रियाशील कार्बोहाड्रेटचे सेवन करायला हवे. त्यासाठी निम्नलिखित पदार्थ त्वरित ऊर्जा प्रदान करू शकतात आणि स्थिती सुधारता येते. -

  •  नॉन-डाएट सोडा अर्धा किंवा पाऊण कप
  •  फळांचा रस अर्धा कप
  • फळांचे तुकडे निदान २ टेबलस्पून,
  • एक कप दूध,
  • ५ कॅन्डी
  • ग्ल्यूकोजच्या ३ गोळ्या (प्रत्येकी ५ ग्रॅमच्या )

जर हे पदार्थ घेऊनही बरे वाटले नाही तर पंधरा मिनिटांनी पुन्हा एकदा हे पदार्थ पंधरा ग्रॅम इतके घ्यावेत. जेणेकरून रक्तात ग्ल्यूकोजचे प्रमाण वाढावे.

व्यायाम चांगल्या प्रकारे करता यावा म्हणून काय करावे ?

मधुमेहाच्या अनेक रुग्णांना पायांतील शिरांमध्ये समस्या असते. व्यायाम करतेवेळी पुष्कळदा त्यांच्या हा लक्षात येत नाही. याला इंग्रजीत 'डायाबेटिस न्यूरोपॅथी' म्हणतात. त्यासाठी पायात असे पादत्राण घालावेत जे थोडे घट्टसर असतील किंवा बरोब्बर मापाचे असतील. अन्यथा पायात छाले किंवा घाव होऊ शकतात. त्यांचा वेळीच उपचार न झाल्यास त्यांतून संसर्गजन्य त्वचारोग उद्भवू शकतात. व्यायामापूर्वी आणि नंतरही आपले पाय तपासावेत, त्यामुळे काही समस्या उद्भवली आहे की काय ते समजेल.

मधुमेह, व्यायाम आणि वजन

निदान पाच किलो वजन कमी करण्याने इन्स्यूलिनची कार्यक्षमता वाढते आणि आपली शर्करा नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. वजन कमी होण्याचे दूरगामी लाभ असतात.

रक्तशर्करा कमी झाली तर वजन वाढते काय ?

होय. ही संभावना आहे. वजन वाढू नये म्हणून भरपूर व्यायाम करावा आणि अति भोजन टाळावे. आहार आणि व्यायामाचे योग्य समायोजन व्हावे म्हणून आरोग्यतज्ञ (हेल्थ प्रोफेशनल) चा सल्ला जरूर घ्यावा.

मधुमेही व्यक्तीने वजन कमी करण्यासाठी प्रभावी उपाय कोणता योजावा ? नियमित व्यायाम आणि योग्य पोषण ही वजन कमी करण्याची किल्ली आहे. व्यायामाखेरीज कॅलरी कमी करूनही वजन कमी होऊ शकते.

'डाएटिंगनेही वजन कमी होते, तर मग व्यायामाची गरज काय ? वजन कमी करण्याचा 'डाएटिंग' हा तात्पुरता उपाय आहे. आहार-नियंत्रणाच्या (डाएटिंग) अंतर्गत कॅलरीजना अति सीमित करण्याची योजना कुणालाच उपयुक्त नाही.

विशेषत: मधुमेह पीडितांना. कारण त्यांचा रोग बळावू शकतो. व्यक्तीला उचित डाएटिंगच्या बरोबर व्यायाम करण्याने कमी झालेले वजन टिकवून ठेवता येते आणि शरीरही बलशाली राहते. व्यायामामुळे रक्तशर्करा नियंत्रित राहते. सकाळी फिरायला जाणे हा एक उत्तम व्यायाम आहे. पुष्कळ लोक आपल्या पाळीव कुत्र्याला सकाळी फिरायला नेतात त्यामुळे त्यांनाही आपोआपच व्यायाम घडतो. दिवसा जवळपास कुठे जायचे झाल्यास वाहनाचा उपयोग न करता पायी जाणे श्रेयस्कर आहे. पायऱ्या चढणे, उतरणे, पोहायला जाणे हे देखील उपयुक्त व्यायाम आहेत. रुग्णांनी घरी खुर्चीत बसल्या बसल्या हात-पाय वरखाली करण्यासारखे बैठे व्यायाम निवडावेत.

ध्यान-धारणा

ध्यानस्थ बसण्याचा अभ्यास 'स्ट्रेस मॅनेजमेंट' साठी (ताण-तणाव ) उपयोगाचा आहे. ध्यानस्थ बसणे सोपे नाही परंतु त्याच्या अभ्यासाचेही अनेक लाभ आहेत. ध्यान करताना जर प्रणव मंत्र 'ॐ' कार नादाचा जप साधता आला तर त्याच्या सकारात्मक प्रभावाने रक्तशर्करा नियंत्रित होऊ शकते. ध्यानाचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत

● ध्यानामुळे विचारांवर नियंत्रण ठेवता येते. मन व इन्द्रियांवर नियंत्रण ठेवता यावे म्हणून ध्यानाचे महत्त्व आहे.

ध्यानात धारणेला महत्त्व आहे. मनात जी धारणा धरली असेल त्यावर ध्यान केन्द्रित केले जाते.

ध्यानात प्राणायामाच्या द्वारे श्वासावर नियंत्रण ठेवता येते.

मधुमेह आणि योगासने

जरी 'योगा' करण्याने मधुमेहाचा रोगोपचार होत नसला तरी जीवनशैली बदलता आल्याने त्याच्या लक्षणावर नियंत्रण होऊ शकते. त्याने व्यक्तीला शरीरस्वास्थ्य मिळवण्यात मदत होऊ शकते. योगामुळे जीवन संतुलित होऊन प्रसन्न वाटते, समजा, एखाद्याला आपले वजन कमी करायचे असेल तर काही विशिष्ट योगासने लाभदायक ठरू शकतात. 'योगा'तील व्यायामाने रक्तदाब कमी होतो.